ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रधानमंत्री आवास योजनेतून इचलकरंजीत ४३२ घरकुलांचा पहिला टप्पा- माजी मंत्री प्रकाश आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री आवास योजनेतून इचलकरंजीत ४३२ घरकुलांचा पहिला टप्पा- माजी मंत्री प्रकाश आवाडे

इचलकरंजी: सर्वसामान्य नागरिक व यंत्रमाग उद्योगातील कामगारांना हक्काचे व परवडणारे घर मिळावे यासाठी सांगली नाका-टाकवडे रोड परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४३२ घरकुलांचा पहिला टप्पा साकारला जात असल्याची माहिती माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली. राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे आयोजित प्रकल्प माहिती कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी चार मजली नऊ इमारती उभारण्यात येणार असून पुढील टप्प्यात संपूर्ण मतदारसंघात तीन हजार घरकुले उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाकडून १.५० लाख व राज्य शासनाकडून १ लाख अशी एकूण २.५० लाख रुपयांची सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच बांधकाम कामगारांसाठी अतिरिक्त २ लाखांची सबसिडी उपलब्ध असून आणखी १ लाख रुपयांच्या अनुदानासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आ.राहुल आवाडे यांनी, “कामगारांच्या शहरात प्रत्येकाला स्वतःचे घर मिळण्यासाठी अशा प्रकल्पांची गरज असून शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे सांगितले.
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे
 यांनी ९ लाख रुपयांच्या ३२५ स्क्वेअर फूट घरासाठी लाभार्थ्याला १ लाख रुपये भरावे लागतील, तर उर्वरित ८ लाखांचे कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती दिली. कार्यक्रमात दिनेश रोकडे यांनी स्लाईड शोद्वारे प्रकल्पाची माहिती दिली.
यावेळी प्रकाश दत्तवाडे, महापौर उदय धातुंडे, राहुल घाट, सुनिल मेटे, वैशाली आवाडे, तन्वी कुलकर्णी, चंद्रकांत चौगुले, बाळासाहेब कलागते, रुबन आवळे, रवी रजपुते, संजय केंगार, योगेश पाटील आदींसह कामगार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत महेश सातपुते यांनी तर प्रास्ताविक चंद्रकांत अतिगिडद यांनी केले. सूत्रसंचालन अहमद मुजावर यांनी केले.
मेळाव्यात बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा