शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कै. महेशजी बोहरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
इचलकरंजी :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक तथा विद्यमान उपजिल्हाप्रमुख स्वर्गीय महेशजी बोहरा यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिवसेना पक्षात हळहळ व्यक्त होत असून, पक्षाच्या वतीने शोकसभा घेऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या उपस्थितीत आयोजित शोकसभेत पदाधिकारी व शिवसैनिकांनी कै. महेशजी बोहरा यांच्या कार्याचा व आठवणींचा भावपूर्ण उल्लेख केला. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध यामुळे त्यांनी पक्षात वेगळी ओळख निर्माण केली होती, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या शोकसभेस राज्य संघटक नवेज मुल्ला, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, माजी शहरप्रमुख धनाजी मोरे, इचलकरंजी शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, माजी शहरप्रमुख तथा नगरसेवक सयाजी चव्हाण, बजरंग लोणारी, मोहनभाई पटेल, दिनेश पित्रोडा, भरत शिवलिंगे, गणेश शर्मा, गणेश भांबे, बसय्या स्वामी, लक्ष्मण पाटील, राजेंद्र मोकाशी, दत्ता साळोखे, विजय जोशी, सतीश लाटणे, विजय देवकर, उमेश पाटील, शितल मगदूम, अनिल मोरे, युवासेनेचे अभिजित लोले, अरविंद मस्के, अविनाश धुळुगडे, सुरेश चव्हाण, दीपक नरदेकर, सौ. मधुमती खराडे, रवी धनगर यांच्यासह शिवसैनिक व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोकसभेत बोलताना शिवसेना उपनेते संजय पवार
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








