ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रोसेस पाठोपाठ यंत्रमाग कारखानेही बंद; औद्योगिक परिस्थिती चिघळण्याची शक्यता

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रोसेस पाठोपाठ यंत्रमाग कारखानेही बंद; औद्योगिक परिस्थिती चिघळण्याची शक्यता

इचलकरंजी
इचलकरंजीतील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नामुळे शहरातील सुमारे १५० लहान-मोठे प्रोसेस उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. शिरोळ तालुक्यातील ११ गावांनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महापालिका व नियुक्त समितीने प्रोसेस बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुमारे आठ ते नऊ हजार कामगार बेरोजगार झाले असून त्यांच्या कुटुंबांपुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी २०१३ पासून मजुरी वाढ न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वहीफणी दरातील १८ टक्के वाढ आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे यंत्रमागधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. गुरुवारी झालेल्या पॉवरलूम असोसिएशनच्या मेळाव्यात संतप्त यंत्रमागधारकांनी संघटनांविरोधात संताप व्यक्त करत मुख्य प्रवेशद्वार बंद केले. अखेर सोमवारपासून शहरातील सर्व यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे ३० ते ४० हजार कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा