ICHMH51NEWS.IN
9921600800

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

इचलकरंजी :
 इचलकरंजी मंडळामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत राजीव गांधी हॉल येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तसेच विविध विभागांतर्गत लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास अप्पर तहसीलदार श्री. महेश खिलारी, प्रांत कार्यालय इचलकरंजीचे नायब तहसीलदार श्री. संजय काटकर, स्थायी समिती सभापती मा. श्री. सतीश मुळीक, नगरसेवक श्री. राजू बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी इचलकरंजी, संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग, एस.टी. महामंडळ, महावितरण, नगर भूमापन अधिकारी कार्यालय, पशुसंवर्धन विभाग आदी विविध विभागांचा सहभाग होता. संबंधित विभागांकडून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. नागरिकांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शासकीय योजनांविषयी माहिती घेतली. प्रशासनाच्या वतीने असे उपक्रम नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिबिरात लाभार्थीना दाखले वितरित करण्यात आले
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा