ICHMH51NEWS.IN
9921600800

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी

कोल्हापूर :

प्रजापिता हॉल, जयसिंगपूर कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने केन चेस अकॅडमी व अरुणा रोड सोशल फाउंडेशन आयोजित आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या नवसाचा जयसिंगपूरचा राजा चषक 14 वर्षाखालील व खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील नामवंत 170 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत यापैकी 45 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन . माननीय अजय पाटील यड्रावकर व सौ.सानिका आवाडे – पाटील यड्रावकर-यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.. तर संध्याकाळी 5 वाजता स्पर्धेचा बक्षीस समारंभ सौ.स्वरूपा पाटील यड्रावकर(वहिनी) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक रोहित पोळ ,राहुल बंडगर
व अरुणा रोड सोशल फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते. स्वीस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण सात फेरीत झालेल्या या स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे *14 वर्षाखालील गटातील बक्षीस विजेते* प्रथम – अभय भोसले जांभळी, द्वितीय – हित बलदवा जयसिंगपूर, तृतीय – अर्णव पोर्लेकर कोल्हापूर, चतुर्थ – कश्यप खाकरिया सांगली , पाचवा – वरद पाटील मिरज ,सहावा – प्रेम निचल सेनापती कापसे, सातवा – सहर्ष ठोकळे तासगाव, आठवा – आदित्य ठाकूर अतिग्रे, नववा – आशिष मोटे सांगली, दहावा – वैभवी मुळीक . उत्तेजनार्थ बक्षीस पुढील प्रमाणे उत्कृष्ट मुली:- सिद्धी कर्वे जयसिंगपूर, माधवी देशपांडे सांगली, नारायणी घोरपडे कोल्हापूर, सांची चौधरी इचलकरंजी, मृणाल पांडव इचलकरंजी. बेस्ट शिरोळ तालुका 1)हर्ष मादनाईक,2) जानवी देशपांडे ,3) विहान बिरनाळे, 4)रुतुराज पाटील, 5)कबीर शेट्टी.
11 वर्षाखालील उत्कृष्ट:- 1) अद्विक कांबळे,2) पाटील पृथ्वीराज,3) रौनक झंवर, 4) श्रुती पांडव.
09 वर्ष खालील उत्कृष्ट:- 1) अर्णव वरुटे , 2)शिवांश सुतार , 3)शनाया मालानी , 4)संस्कार वाणिरे ,5) केशव कौशिक.
07 वर्ष खालील उत्कृष्ट 1)आरव पाटील, 2)पिळणकर रिशान, 3)श्रेयस पांडव,4) अद्विता देसाई, 5)आधीरा भंडारे .
*खुल्या गटातील बक्षीस विजेते* प्रथम – रवींद्र निकम इचलकरंजी, द्वितीय – दिशा पाटील जयसिंगपूर , तृतीय – विक्रमादित्य चव्हाण सांगली, चौथा – ऋषिकेश कबनुरकर कोल्हापूर, पाचवा – दिशा पाटील जयसिंगपूर , सहावा – अभिषेक पाटील मिरज, सातवा – अथर्व तावरे इचलकरंजी, आठवा – हेमंत भोसले , नववा – सदानंद चौथे सांगली व दहावा – श्रेयस गाताडे कोल्हापूर.
उत्तेजनार्थ बक्षिसे:- उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू:-1) शशिकांत कबनुरकर, 2)रविंद्र कुलकर्णी, 3)दत्तात्रेय राजोपाध्ये, 4)नागेंद्र भोसले.
उत्कृष्ट महिला:1) सौ. रेश्मा नलवडे,2) सारा हरोले ,3) कृष्णाई डोंगरे, 4)प्रणोती कणसे, 5)मैथिली केने
बेस्ट शिरोळ तालुका खेळाडू:- संस्कृती सुतार, आदित्य खिलारे, तरुण गिरमळ, कदम पीयुष, कोळी श्रीरंजन
17 वर्षाखालील उत्कृष्ट खेळाडू: 1)पाटील अभिषू, 2)पाटील आभाष, 3)पाटोळे अथर्व,4) हांजी अर्णव, 5)केणे शंभूराज.
16 वर्षाखालील उत्कृष्ट खेळाडू
1)पार्श्व लिगाडे,2) रुद्र माने, 3)पाटील श्रीवर्धन, 4)कांबळे श्रेयस,5) माने आर्यन.
सर्व विजेते खेळाडूना सहभाग प्रमाणपत्र, रोख रक्कम ट्रॉफी मेडल्स देऊन पाहुणेचे हस्ते गौरविले. सर्व खेळाडू व पालकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. पंच म्हणून करण परीट (मुख्य पंच),वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ, मोहिनीराज डांगे, प्रशांत धनवडे,विजय सलगर दीपक वायचळ व मयुरेश पाटील यांनी काम पाहिले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी