ICHMH51NEWS.IN
9921600800

मजुरी वाढीशिवाय यंत्रमाग सुरू करणार नाही चंदूर येथील मेळाव्यात खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचा निर्धार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मजुरी वाढीशिवाय यंत्रमाग सुरू करणार नाही

चंदूर येथील मेळाव्यात खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचा निर्धार

इचलकरंजी :
 खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरी वाढ मिळत नाही तोपर्यंत यंत्रमाग बंदच ठेवण्याचा निर्धार चंदूर येथे झालेल्या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात करण्यात आला. त्यामुळे इचलकरंजी व परिसरातील यंत्रमाग उद्योगातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ट्रेडिंगधारकांकडून मजुरी वाढ मिळावी या मागणीसाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून इचलकरंजी व परिसरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहातही मेळावा घेण्यात आला होता. शनिवारी अनेक ठिकाणी यंत्रमाग बंद ठेवण्यात आले. काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले असून कारखान्यांमध्ये घुसून बीम कापल्याच्या घटनाही घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
आंदोलनकर्त्या प्रतिनिधींनी आमदार Rahul Awade यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. यावेळी आवाडे यांनी “बंद न करता मार्ग काढू,” असे आश्वासन दिले. मात्र, वैयक्तिक पातळीवर नव्हे तर सामूहिक निर्णय व्हावा, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका राहिली.
रविवारी चंदूर येथील मलाबादे भवन येथे झालेल्या मेळाव्यात “गेल्या १३ वर्षांपासून मजुरी वाढ टाळली जात असून उद्योग अडचणीत आला आहे. मजुरी वाढ मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. प्रांताधिकारी कार्यालयात तातडीने बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.
मेळाव्यास पुंडलिकभाऊ जाधव, नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले आदींनी मार्गदर्शन केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा