डीकेटीईच्या आठ विद्यार्थ्यांची वेलस्पन कंपनीत निवड
इचलकरंजी :
येथील डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातील पाच व बी.टेक. टेक्स्टाईल विभागातील तीन अशा एकूण आठ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य व जागतिक स्तरावर नावाजलेल्या वेलस्पन कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे डीकेटीईच्या उत्कृष्ट शैक्षणिक व प्लेसमेंट परंपरेला पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे.
वेलस्पन कंपनीच्या वापी, अंजार व हैदराबाद येथील अत्याधुनिक उत्पादन युनिटसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. टेरी टॉवेल्स, शीटिंग फॅब्रिक्स, नॉनवोव्हन फॅब्रिक्स व फ्लोअरिंग मटेरियल उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असलेली वेलस्पन कंपनी दरवर्षी डीकेटीई कॅम्पसला भेट देऊन विद्यार्थ्यांची निवड करते.
यावर्षी कंपनीने लेखी परीक्षा, गटचर्चा व वैयक्तिक मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची तांत्रिक गुणवत्ता, संवाद कौशल्य व उद्योगाभिमुख दृष्टीकोन तपासून अंतिम निवड केली.
डिप्लोमा विभागातून सोहम सुळ, आझाद जमादार, पार्थ खाडे, अजयकुमार उपासे व श्रुतिका पाटील, तर बी.टेक. टेक्स्टाईलमधून सानिका पाटील, विनंती चव्हाण व सायली खैरनार यांची निवड झाली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पांणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील व प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. एस. बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
निवड झालेले विद्यार्थी सोबत रवी आवाडे व शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









