इचलकरंजीत विशेष पोलीस मोहिम : २२ गुन्हे दाखल.सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन, मद्यधुंद वाहनचालक व अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई
इचलकरंजी :
इचलकरंजी शहर व परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन, मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे या प्रकारांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण २२ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी दिली.
पोलीस अधीक्षक कोल्हापूर मा. निलोत्पल तसेच अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग मा. आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १२ मे रोजी रात्री ८ ते ११ या वेळेत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. इचलकरंजी, शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली.
सांगली रोड, मुसळे हायस्कूल परिसर, गंगानगर, कोरोची येथील पाण्याची टाकी परिसर, पंचगंगा कारखाना, म्हसोबा मंदिर परिसर, पंचगंगा नदी रोड, शेळके मळा, यशोलक्ष्मी मैदान, भाजी मार्केट, डेक्कन चौक, अलायन्स हॉस्पिटल परिसर तसेच कबनूर येथील पाटील मळा या भागांत पेट्रोलिंग करून तपासणी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळलेल्या १९ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या २ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी १ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान पोलीस
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








