ICHMH51NEWS.IN
9921600800

कुष्ठरोगी रुग्णांना मासिक निर्वाह भत्ता द्या : शिवसेनेची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कुष्ठरोगी रुग्णांना मासिक निर्वाह भत्ता द्या : शिवसेनेची मागणी

इचलकरंजी :
शहरातील सीईटीपीसमोरील कुष्ठरोग वसाहतीतील रुग्णांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळत नसून, त्यांच्यासाठी मासिक निर्वाह भत्ता सुरू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन युवा सेना नेते संदीप माने यांनी मंगळवारी उपमहापौर अनिल डाळ्या यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कुष्ठरोगी असल्यामुळे संबंधित रुग्णांना समाजापासून दूर ठेवले जाते. आजही हा समाज उपेक्षित जीवन जगत असून, त्यांच्या जगण्याला आधार मिळण्याची गरज आहे. कुष्ठरोगी बांधवांच्या वेदना समजून घेत त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये कुष्ठरोगी रुग्णांना दरमहा निर्वाह भत्ता दिला जातो. त्याच धर्तीवर इचलकरंजी महानगरपालिकेनेही तातडीने योजना लागू करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक मनोज हिंगमिरे, हेमंत कांबळे, लखन कांबळे, शाहरुख शेख, भीमा सोनावणे, तानाजी कोळी, विठ्ठल माने, किसन दरडे, देवानंद कांबळे, रेखाबाई रंधवे, पार्वतीताई दराडे, शिलाबाई सुर्यवंशी, मंगलताई भोसले आदी उपस्थित होते.

उपमहापौर अनिल डाळ्या यांना निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा