ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत बकरी ईदनिमित्त ईदगाह मैदान येथे गुरुवारी सकाळी 8.45 वाजता सामुहिक नमाज पठण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत बकरी ईदनिमित्त ईदगाह मैदान येथे
गुरुवारी सकाळी 8.45 वाजता सामुहिक नमाज पठण


इचलकरंजी –
इचलकरंजी येथील स्टेशन राेडवरील ईदगाह मैदान येथे बकरी ईद (ईद उल अजहा) निमित्त सामुहिक नमाज पठण गुरुवार 28 मे राेजी सकाळी 8.45 वाजता आयाेजित करण्यात आली आहे.
बकरी ईद (ईद उल अजहा) नमाजची वेळ व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी हजरत सय्यद मगदुमवली दर्गा व  ईदगाह  ट्रस्टच्या वतीने समाजातील प्रमुख मान्यवर व मस्जिद प्रमुखांची बैठक बाेलविली हाेती. बैठकीत चर्चेमध्ये नमाजची वेळ सकाळी 8.45 वाजता निश्चित करण्यात आली आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठणसाठी ईदगाह मैदान येथे वेळेवर उपस्थित रहावे. सर्वांनी येताना आपापली बिछाईत घेऊन वेळेवर नमाज आदा करण्यासाठी हजर रहावे, असे आवाहन ईदगाह ट्रस्ट आणि हजरत सय्यद मगदुमवली दर्गा यांच्या वतीने बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी केले आहे. 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा