ICHMH51NEWS.IN
9921600800

वकिलांनी न्यायालयीन आदेशांचा सखोल अभ्यास करावा – न्यायाधीश पी. पी. जाधव

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वकिलांनी न्यायालयीन आदेशांचा सखोल अभ्यास करावा – न्यायाधीश पी. पी. जाधव

इचलकरंजी :
दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लेक्चर सिरीजमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार तथा पी. पी. जाधव यांनी उपस्थित राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या वकिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना न्यायाधीश जाधव यांनी वकिलांनी वकिली व्यवसाय करताना न्यायालयीन आदेशांचा सखोल अभ्यास करावा, बेअर अॅक्टचे नियमित वाचन करावे तसेच दोषारोपपत्राचे बारकाईने परीक्षण करावे, असे सांगितले. न्यायालयीन कामकाजातील विविध पैलूंवर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला वकिलांनी पती-पत्नीमधील वाद मिटविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात सरकारी अधिवक्ता दिपक मिरजे यांनी भारतीय साक्ष पुराव्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष राजाराम सुतार आणि सरकारी अधिवक्ता दिपक मिरजे यांच्या हस्ते न्यायाधीश पी. पी. जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या लेक्चर सिरीजमध्ये यापूर्वी जी. एम. नदाफ, संजीव नदाफ आणि अनिल रुईकर यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच लवकरच सांगली येथे वरिष्ठ अधिवक्ता चिराग सोनेचा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खजिनदार विजय शिंगारे यांनी दिली.
या लेक्चर सिरीजसाठी तज्ज्ञ वकील व न्यायाधीशांना निमंत्रित करण्यासाठी अॅड. डी. एम. लटके, अॅड. श्रद्धा आरेकर, अॅड. इरफान जमादार, अमित सिंग यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सचिव अॅड. अभिजीत माने, सहसचिव अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, अॅड. अर्चना कुलकर्णी (ओगले), अॅड. किर्ती जैंद, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे वकील, क्लार्क प्रविण फगरे तसेच बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

मार्गदर्शन करताना न्यायाधीश पी.पी.जाधव

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा