खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप,गजेंद्र लोहार यांचा तपास
इचलकरंजी:
इचलकरंजी पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये दाखल झालेल्या खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, इचलकरंजी यांनी आरोपी गणेश नारायण इंगळे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात योगेश हनुमंत शिंदे (मयत) व गणेश नारायण इंगळे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या खटल्याची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश भोसले यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी गणेश नारायण इंगळे याला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले.
न्यायालयाने आरोपीस कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच कलम २०१ अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केला होता. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील व्ही. जी. सरदेसाई यांनी बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस कॉन्स्टेबल आर. ए. चौधरी यांनी पैरवी केली.
या निकालामुळे सात वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणाचा न्यायालयीन शेवट झाला असून आरोपीला कठोर शिक्षा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






