ICHMH51NEWS.IN
9921600800

देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांना इचलकरंजी महानगरपालिकेकडून अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांना इचलकरंजी महानगरपालिकेकडून अभिवादन

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (२६ मे) महानगरपालिका सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहाय्यक आयुक्त सुनील शिंदे, सहाय्यक आयुक्त नितीन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख धनंजय पळसुले, संदीप जोशी, सचिन खोंद्रे, वसंत भाट, परशुराम पोवार आदी उपस्थित होते.
देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

अभिवादन करताना अति आयुक्त सुषमा शिंदे व कर्मचारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा