ICHMH51NEWS.IN
9921600800

वेडा म्हटल्याच्या गैरसमजातून धमकी; शहापूर येथे गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेडा म्हटल्याच्या गैरसमजातून धमकी; शहापूर येथे गुन्हा दाखल

इचलकरंजी :
 वेडा म्हटल्याचा गैरसमज करून एका व्यक्तीस अडवून शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात रमेश बसाप्पा विरापुरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दादासो गुंडु भाटले (वय ४८, व्यवसाय-शेती, रा. जावई वाडी, गणेश मंदिराजवळ, शहापूर ता. हातकणंगले) यांच्या फिर्यादीनुसार
२७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास चौडेश्वरी कॉलनी, शहापूर येथे दावणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादी यांनी आरोपीच्या भावास आरोपी वेडा असल्याचे सांगितल्याचा गैरसमज आरोपीने करून घेतला होता. त्यातून आरोपीने स्वतःच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकल फिर्यादी यांच्या मोटारसायकलसमोर आडवी लावून त्यांना थांबवले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करण्यासाठी अंगावर धावून जात धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी यांनी समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.कॉ.पाटील करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा