ICHMH51NEWS.IN
9921600800

एसटी बसमधील गर्दीत महिलेची पर्स लंपास; नागपूरच्या चार महिलांविरुद्ध गुन्हा,मुद्देमाल हस्तगत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एसटी बसमधील गर्दीत महिलेची पर्स लंपास; नागपूरच्या चार महिलांविरुद्ध गुन्हा,मुद्देमाल हस्तगत

इचलकरंजी :
एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी नागपूर येथील चार महिलांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अंकिता विरकुमार चौगले (वय ३०, रा. गळतगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव, सध्या पळशी रोड, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौगले या भेंडवडे येथे जाण्यासाठी मंगळवारी (दि. २) दुपारी इचलकरंजी एसटी स्थानकात आल्या होत्या. वाठारकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये गर्दीतून चढत असताना आरोपींनी त्यांच्या पर्समधील १ हजार ६२० रुपये रोख रक्कम व ४ हजार ३२० रुपये किमतीच्या चांदीच्या तीन जोडव्या असा एकूण ५ हजार ९४० रुपयांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी गीता महेंद्र लोंढे (वय ३५), शरीफा सुरेश मानकर (वय ४५), सारिका धाशाशी लोंढे (वय ३५) व ममता जितेंद्र लोंढे (वय ३०, सर्व रा. मानेवाडा चौक, ता. अंजनी, जि. नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तो जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा