ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी एसटी स्थानकात महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे सोन्याचे गंठण लंपास.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी एसटी स्थानकात महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे सोन्याचे गंठण लंपास.

इचलकरंजी :
येथील एसटी स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. ३०) सायंकाळी घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुजा जावेद शेख (वय ३७, रा. मानेनगर, रुई, ता. हातकणंगले) या कबनूर येथे जाण्यासाठी इचलकरंजी एसटी स्थानकात आल्या होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये गर्दीतून चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व पदक असलेले मंगळसूत्रसदृश दागिने चोरून नेले.
घटनेनंतर तनुजा शेख यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल चौगुले करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा