ICHMH51NEWS.IN
9921600800

काँक्रीट रस्त्यामुळे पाणी साचण्याची भीती; निचऱ्याच्या नियोजनासाठी मनसेचे निवेदन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

काँक्रीट रस्त्यामुळे पाणी साचण्याची भीती; निचऱ्याच्या नियोजनासाठी मनसेचे निवेदन

इचलकरंजी :
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक मार्गावर सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे भविष्यात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) इचलकरंजी शहरच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेला निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
मनसेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेऊन संबंधित रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नियोजन करण्याची मागणी केली. तसेच आवश्यक ठिकाणी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी संबंधित रस्त्यासाठी सध्या गटारीची मंजुरी नसल्याची माहिती दिली. मात्र, या समस्येवर लवकरात लवकर योग्य उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, शहर उपाध्यक्ष नितीन कटके, अभिषेक सारडा, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनायक मुसळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अनिल झाडबुके, वाहतूक सेना शहराध्यक्ष विशाल पाच्छापुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अति आयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा