ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपात एकल महिला दिन साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपात एकल महिला दिन साजरा

इचलकरंजी:
आंतरराष्ट्रीय विधवा दिन आणि इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे मंगळवारी महानगरपालिका सभागृहात ‘एकल महिला दिन’ साजरा करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
कार्यक्रमात महात्मा फुले यांनी विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. स्त्री शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, पुनर्विवाह आणि समानतेच्या विचारांचा वारसा आजही प्रेरणादायी असल्याचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. डी. वाय. जमादार यांनी समुपदेशनपर मार्गदर्शन केले, तर एम. एम. माने यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मार्गदर्शन करताना आयुक्त पल्लवी पाटील, अति आयुक्त सुषमा शिंदे,महापौर उदय धातूंडे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा