ICHMH51NEWS.IN
9921600800

मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्थेचा ‘मैत्रीरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा दिमाखात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्थेचा ‘मैत्रीरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा दिमाखात संपन्न

इचलकरंजी :

मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित ‘मैत्रीरत्न पुरस्कार वितरण सोहळा’ रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी महेश क्लब येथे उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशआण्णा आवाडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. प्रीती पटवा, शैलजा शिंदे, अभिजित कवडे, राऊ वठारे तसेच डॉ. आरती कोळी यांनी उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय काम युवराज गायकवाड व द्वारकेश मोरे यांनी पाहिले. प्रास्ताविक सुमित ढापळे यांनी केले, तर शैलेश गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी प्रकाशआण्णा आवाडे, प्रीती पटवा, आनंद पटवा आणि डॉ. आरती कोळी यांनी मार्गदर्शन करत मैत्री परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘मैत्रीरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

यामध्ये आदर्श समाजसेविका म्हणून प्रा. डॉ. प्रतिभा भारत पैलवान, आदर्श शिक्षिका म्हणून अश्विनी भगवंत कुलकर्णी, स्वच्छता दूत म्हणून कविता विठ्ठल सोळंकी, आदर्श क्रीडा प्रशिक्षक म्हणून तात्यासाहेब दत्तात्रय कुंभोजे, कृषिभूषण म्हणून रामगोंडा कलगोंडा पाटील, बेस्ट मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून पूनम संदीप पाटील आणि युवा उद्योजक म्हणून शुभम मंजुनाथ अनवेकर यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. जी. सुतार, प्रशांत आमणे आणि अमोल वस्तरे यांनी केले. राजू काकणकी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवराज गायकवाड, द्वारकेश मोरे, सोनल नाकील, संदीप असंगी, ओंकार कडोलकर, कल्लाप्पा वठारे, शंकर सुरपूर, प्रशांत गोंदकर, सोमनाथ नरळे, अमर हजारे, प्रथमेश सोळशे आणि केतन खोत यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा