ICHMH51NEWS.IN
9921600800

लव्ह जिहाद विषयावर रमेश शिंदे यांचे २७ जूनला व्याख्यान 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लव्ह जिहाद विषयावर रमेश शिंदे यांचे २७ जूनला व्याख्यान 

इचलकरंजी:
बेटी बचाव–देश बचाव अभियानांतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहादची भयावहता आणि त्यावरील उपाययोजना’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील जिव्हाजी सांस्कृतिक भवन येथे होणार असल्याची माहिती समितीचे शिवानंद स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे तसेच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी लव्ह जिहाद या विषयाचे गांभीर्य, त्याविषयी मांडले जाणारे मुद्दे तसेच विविध उपाययोजनांबाबत सविस्तर विवेचन केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
समितीच्या मते, धर्मांतरण आणि लव्ह जिहादशी संबंधित घटनांबाबत समाजात जनजागृती होणे आवश्यक असून नागरिकांनी या विषयाकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद–राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा विशेष संपर्क प्रमुख संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, अंजली पोळ, उद्योजक दिलीप पटेल, आनंदा मकोटे, मोहन मालवणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमास नागरिक, युवती, माता-भगिनी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा