ICHMH51NEWS.IN
9921600800

माहिती अधिकार कायद्यातील नव्या तरतुदी रद्द करा अन्यथा आंदोलनाचा इशारा- लोक आंदोलन न्यास.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती अधिकार कायद्यातील नव्या तरतुदी रद्द करा अन्यथा आंदोलनाचा इशारा- लोक आंदोलन न्यास.

इचलकरंजी :
 माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत १२ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या नव्या तरतुदी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन प्रांताधिकारी, इचलकरंजी यांच्यामार्फत सादर करण्यात आले.नव्या तरतुदी रद्द न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा लोक आंदोलन न्यास कोल्हापूर जिओह्याच्या
निवेदनात म्हटले आहे की,  वतीने देण्यात आला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेल्या नव्या परिपत्रकानंतर राज्यभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे,पुणे विभागीय माहिती आयुक्त मकरंद रानडे आणि संभाजीनगर विभागीय माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी राळेगण येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली होती.
माहिती आयोगाचे मूलभूत कार्य माहिती अधिकार कायदा व नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हे असताना, कलम ४(१)(ब) ची प्रभावी अंमलबजावणी अनेक वर्षांपासून झालेली नसल्याचा मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. आयोगाच्या अहवालातही अनेक प्रकरणांमध्ये जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्यांकडून वेळेत कार्यवाही होत नसल्याचे नमूद असल्याचा उल्लेख करण्यात आला.
नव्या नियमावलीतील अपील शुल्कवाढ, अधिक कागदपत्रांची मागणी आणि ओळखपत्र सादरीकरणाच्या अटींमुळे माहितीचा अधिकार वापरणे अधिक कठीण होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वकील बांधवांना अर्जदारांच्या वतीने बाजू मांडण्यास मर्यादा घालण्यात आल्याची टीकाही करण्यात आली.
माहितीचा अधिकार अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विद्यमान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जबाबदारी निश्चिती आणि उत्तरदायित्व वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्यायकारक तरतुदी त्वरित मागे न घेतल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेनुसार स्थानिक स्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन न्यासाचे जिल्हाध्य अभिजित राजेंद्र पटवा यांनी सादर केले. प्रत माहितीकरिता इचलकरंजी बार असोसिएशनकडे देण्यात आली असून अध्यक्ष राजगोपाल तोष्णीवाल व अॅड. भरत जोशी यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
यावेळी शीतल मगदुम, महेंद्र जाधव, राजू कोन्नुर, सुहास नाईक, पवन माने, हरीश देवाडिगा, दीपक जाधव, मनोज खेतमर, आरती फुटाणे, प्रसाद फुटाणे, सतीश कुलकर्णी, सचिन कांबळे  उपस्थित होते.
प्रांत कार्यालयात व बार असोसिएशनला निवेदन देताना लोक आंदोलन न्यासाचे कार्यकर्ते
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा