ICHMH51NEWS.IN
9921600800

भुयारी गटार योजनेतील त्रुटींवर चौकशी व कारवाईची मागणी; उमाकांत दाभोळे आक्रमक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भुयारी गटार योजनेतील त्रुटींवर चौकशी व कारवाईची मागणी; उमाकांत दाभोळे आक्रमक

इचलकरंजी :
शहरात सुरू असलेल्या सुमारे ₹५२० कोटींच्या भुयारी गटार योजनेच्या कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळत असून संबंधित मक्तेदार, PMC (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी) कंपनी आणि जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा इचलकरंजीचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी केली आहे.
आयुक्त, महापौर आणि उपमहापौर यांना दिलेल्या निवेदनात दाभोळे यांनी शहरातील विविध भागांतील कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. खुदाईनंतर रस्त्यांची योग्य पुनर्स्थापना न करता केवळ मुरूम किंवा माती टाकून खड्डे बुजविले जात असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खचत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले चेंबर निकृष्ट दर्जाचे असून त्यांची उंची, पातळी आणि स्थान तांत्रिक निकषांनुसार नसल्याचे त्यांनी नमूद केले. काही भागांत पाईपलाईनची कामे घाईगडबडीत झाल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कामांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून दोषपूर्ण कामे पुन्हा करून घ्यावीत, अपूर्ण कामांची बिले रोखावीत आणि PMC कंपनीच्या कामकाजाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दाभोळे यांनी दिला आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा