ICHMH51NEWS.IN
9921600800

दिवसा भररस्त्यात दरोडा; तरुणाकडून मोबाईल, रोकड व दुचाकी हिसकावल्याचा गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिवसा भररस्त्यात दरोडा; तरुणाकडून मोबाईल, रोकड व दुचाकी हिसकावल्याचा गुन्हा दाखल

इचलकरंजी :
भोने माळ परिसरात भरदिवसा एका तरुणाला धमकावून त्याच्याकडील मोबाईल, रोकड व दुचाकी हिसकावून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुतिक जिव्हाजी कौले (वय २५, रा. लांडे हॉस्पिटलजवळ, भोने माळ, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी रुपेश पंडित नरवाडे (रा. शास्त्री सोसायटी, भोने माळ) व सुमीत प्रदीप परीट (रा. साई मंदिरजवळ, कबनूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास भोने माळ येथील महालक्ष्मी मिल स्टोअरजवळील कार्यालयासमोर ही घटना घडली. फिर्यादी तेथे असताना आरोपी निळ्या रंगाच्या अॅक्सेस मोपेडवर आले. आरोपींपैकी एकाने फिर्यादीला धमकावत पैसे व मोबाईल देण्याची मागणी केली. त्यानंतर दोघांनी मारहाण करून जबरदस्तीने फिर्यादीकडील आयफोन १६ सिरीज व विवो व्ही२० प्रो मोबाईल, रोकड असलेले पाकीट तसेच दुचाकी हिसकावून घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी मोबाईलचे पासवर्डही जबरदस्तीने घेतले तसेच मोबाईलमधील आर्थिक व्यवहार अॅपवरील शिल्लक तपासल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत एकूण सुमारे १ लाख २३ हजार २०० किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा