ICHMH51NEWS.IN
9921600800

अल्पवयीन मुलींशी संबंधित प्रकरणात युवकावर दोन गुन्हे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अल्पवयीन मुलींशी संबंधित प्रकरणात युवकावर दोन गुन्हे

इचलकरंजी – सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींशी संपर्क साधून त्यांच्याशी गैरवर्तन व लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात समीर अल्लाबक्ष मणेर वय २१ रा.पोवार माळ याच्यावर शिवाजीनगर पोलिस  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन तक्रारी नोंद झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली असून संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अल्पवयीन मुलींशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून संबंध ठेवले तसेच एका मुलीशी विवाहाचे अमिश दाखवून फसविल्याचा व गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते संबंधित परिसरात जमले होते. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी संबंधित व्यक्तीचा शोध घेत असताना त्याच्या कुटुंबातील सदस्यासोबत धक्काबुक्की व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेनंतर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी शरद मेमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत तपासाबाबत सूचना दिल्या.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा