शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत संगांनियो मंजुरी पत्र वितरण- अनिल डाळ्या
इचलकरंजी
संजय गांधी निराधार योजनेची २१३८ मंजुरी पत्रक वितरण सोहळा शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता घोरपडे नाट्यगृहामध्ये पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते तसेच हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने राज्यसभा खासदार धनंजय महाडिक तसेच इचलकरंजी चे आ प्रकाश आवाडे व माजी आमदार व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी दिली.
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा अपंग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनेची मंजुरी पत्र वाटप होणार असून लाभार्थ्यांनी ठीक ९.३० वाजता घोरपडे नाट्यगृहामध्ये उपस्थित राहावे. मंजुरी पत्र घेतलेल्या लाभार्थ्यांनी लगेचच आपले खाते उघडून त्याची पूर्ण केवायसी हे संजय गांधी ऑफिसमध्ये द्यावे जेणेकरून लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रति महिना मंजुरी झालेल्या तारखेपासून खात्यात ट्रान्सफर करता येईल. ही सर्व मंजुरी पत्रे नाट्यगृहामध्ये १० टेबल लावून एकाच दिवशी एकाच वेळेला सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना दिली जातील. तेव्हा सर्व लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्रजी माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, शहर अध्यक्ष भाजपा अमृतमामा भोसले, शिवसेना शहर अध्यक्ष भाऊसो आवळे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे, तसेच इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांची असणार आहे.तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समिती सदस्य सुखदेव माळकरी कोंडीबा दवडते संजय नागुरी,सलीम मुजावर,तमन्ना कोटगी, जयप्रकाश भगत, सौ सरिता आवळे, महेश ठोके, महेश पाटील यांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800