अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार धनजंय महाडिक यांनी घेतली भेट, २०१९ प्रमाणे याहीवर्षीच्या पुरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार धनजंय महाडिक यांनी घेतली भेट, २०१९ प्रमाणे याहीवर्षीच्या पुरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही

अकिवाट – बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर, महापूराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि दोघांचा मृत्यू झाला. तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अजुनही बेपत्ता आहेत. त्या दुर्दैवी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची मंगळवारी खासदार धनजंय महाडिक यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान २०१९ च्या पूराप्रमाणे यंदाही पूरग्रस्तांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
अकिवाट – बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवून झालेल्या दुर्घटनेत सरपंच पती सुहास पाटील आणि माजी सरपंच आण्णासाहेब हसुरे यांचा मृत्यू झाला. तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अजुनही बेपत्ता आहेत. दुर्घटनाग्रस्त या कुटूंबियांची मंगळवारी खासदार धनजंय महाडिक यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले. त्या दुर्घटनेमुळे अजुनही अकिवाट गावात शोकमग्न वातावरण आहे. अशावेळी महाडिक परिवार आणि शासन आपल्या पाठिशी असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. या दुर्घटनेतून बचावलेले रामदास माने, सागर माने, अरूण कांबळे यांची खासदार महाडिक यांनी भेट घेतली. तर तिंघाना बुडताना वाचविणार्‍या ओंकार बागडी, आनंदा बागडी यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान अकिवाट – बस्तवाड दरम्यानचा रस्ता रूंद करून, पूराचे पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी रस्त्याखालून पाईपलाईन टाकावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी अपघात स्थळाची पाहणी केली. २०१९ च्या पूराप्रमाणे यंदाही पुरग्रस्तांना शासन स्तरावरून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, उदय डांगे, अरविंद माने, अबीदीन मुजावर, रोहित तवंदकर, हरिश्चंद्र पाटील, संभाजी भोसले, पोपट पुजारी, आप्पासाहेब म्हैशाळे, भगतसिंग रजपूत, चंद्रकांत कुलकर्णी, संतोष लाटवडे, नंदकुमार निर्मळे, बाळासाहेब उमाजे, रमेशकुमार मिठारे, राजगोंडा पाटील, श्रीधर पवार, संदीप भाटणकर, आण्णासो कागले, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More