इंदिरा गांधी रुग्णालयाला पीएम केअर्स निधीतून एमआरआय मशीन मंजूर
इचलकरंजी
इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी पीएम केअर्स निधीतून एमआरआय मशीन मंजूर झाले असून, आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या सुविधेमुळे इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ तसेच सीमावर्ती भागातील रुग्णांना एमआरआयसाठी अन्यत्र जावे लागणार नाही. त्यामुळे वेळ, खर्च आणि गैरसोय कमी होणार आहे. रुग्णालयातील दाखल रुग्णांना एमआरआय सेवा मोफत, तर बाह्यरुग्णांना अल्पदरात उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याने ही मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








