इचलकरंजी महापालिकेत ‘नमस्ते दिन’ उत्साहात; सफाई मित्रांची आरोग्य तपासणी, PPE किटचे वितरण
इचलकरंजी :
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘नमस्ते’ (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेअंतर्गत तसेच स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेत ‘नमस्ते दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सफाई मित्रांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि PPE किट वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त विद्या कदम यांच्या आदेशानुसार व घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख धनंजय पळसुले यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी त्यांना वैयक्तिक सुरक्षा साधनांचे (PPE) किट वितरित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील ‘नमस्ते’ कार्यक्रमाचे ऑनलाइन वेबकास्टही दाखविण्यात आले. यावेळी अभियानाची उद्दिष्टे, यांत्रिक स्वच्छतेचे महत्त्व आणि सुरक्षित कामकाजाबाबत माहिती देण्यात आली.
प्रमुख स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव, सुरज माळगे, संग्राम भोरे, शहर समन्वयक विपुल अपराध, सुशांत बोरे, स्वच्छता निरीक्षक, मुकादम व घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. सफाई मित्रांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आरोग्य मित्राना पीपीई किट वितरित करण्यात आले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




