ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी पंकज कोठारी; आज पदग्रहण सोहळा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी पंकज कोठारी; आज पदग्रहण सोहळा

इचलकरंजी, दि. १४ : सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी रो. पंकज कोठारी, सचिवपदी रो. सुनील यळरुटे आणि खजिनदारपदी रो. शिवदास कित्तुरे यांची निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आज बुधवार, दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता राधे बँक्वेट हॉल, जवाहरनगर, इचलकरंजी येथे होणार आहे.

या सोहळ्यात रोटरीचे माजी प्रांतपाल रो. प्रताप पुराणिक (कोल्हापूर) यांच्या हस्ते पदग्रहण होणार असून, आयपीडीजी इंजि. रो. अरुण डी. भंडारे, उपप्रांतपाल सौ. यास्मिन मनेर आणि रो. सुदर्शन कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी नव्या कार्यकारिणीचाही पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. कार्यकारिणीत प्रेसिडेंट-इलेक्ट चंद्रकांत मगदूम, उपाध्यक्ष पिरगोंडा (राजू) पाटील, संयुक्त सचिव संतोषकुमार मगदूम, क्लब सर्व्हिस राजाराम जाधव, व्होकेशनल सर्व्हिस शरद देसाई, कम्युनिटी सर्व्हिस संजय खोत, इंटरनॅशनल सर्व्हिस अनिल भुतडा, इंटरॅक्ट अँड रोटरॅक्ट उत्तम रुग्गे, न्यू जनरेशन मुकुंद माळी, लिटरसी कमिटी सागर पाटील, पोलिओ प्लस डॉ. अभिजीत कलावडे, युथ सर्व्हिस नितीन भागवत, सार्जंट-अॅट-आर्म्स विक्रम बुचडे, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट संजय घायतिडक तसेच रोटरी वेल्फेअर ट्रस्टचे चेअरमन प्रकाश गौड यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास रोटरी परिवारातील पदाधिकारी, सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा