स्थायी समितीच्या बैठकीत भाजपच्या हाळवणकर समर्थक ५ नगरसेवकांचे बंड,२२ कोटींचा कचरा संकलन ठराव नामंजूर.
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेत स्थायी समितीच्या सभेत इचलकरंजी शहरातील कचरा संकलन व आरोग्य विभागाशी निगडित २२ कोटी रुपयांचा ठराव भाजपच्या ५ नगरसेवकांनी बंड केल्याने ९ विरोधी ६ मतांनी नामंजूर करण्यात आला.भाजप मधील हाळवणकर समर्थक नगरसेवक तानाजी पोवार,विजया महाजन,मनोज हिंगमिरे प्रदीप धुत्रे,वैशाली मोहिते यांनी या ठरावास विरोध केला त्याला शिवशाहू आघाडीच्या ४ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने सदर ठराव ९ विरोधी सहा मतांनी नामंजूर करण्यात आला.
याबाबत २२ कोटी रुपयांचे टेंडर काढल्याने त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप विरोधकांनी केला.हाळवणकर समर्थक नगरसेवकांनी विरोधात तर आवाडे समर्थक सभापती सतीश मुळीक,किरण खवरे,ध्रुवती दळवाई,नितेश पोवार,सुशांत कलागते,रवी रजपूते यांनी मतदान केले.
५ नगरसेवक म्हणजे पक्ष नाही- महापौर उदय धातूंडे
आम्ही काम व्यवस्थित व्हावे व जबाबदारी निश्चित करण्यात यावी म्हणून वेगवेगळी काढली जाणारे टेंडर एकत्रित केल्याने रक्कम मोठी दिसली ते ५ नगरसेवकाना पटले नसले तरी ते नगरसेवक म्हणजे पक्ष नाही,आम्ही वरिष्ठांना कल्पना देऊन परत सभागृहासमोर आणू तसंच शहराचा विकास थांबू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
स्थायी समिती सभापतीनी राजीनामा द्यावा-विरोधीपक्षनेते उदयसिंग पाटील.
स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवकांना भ्रष्ट कारभाराची भूमिका न पटल्याने त्यांनी विनंती केल्याने आम्ही त्यास पाठिंबा दिला असून स्थायी समिती सभापती यांनी अल्पमतात गेल्याने राजीनामा द्यावा अशी भूमिका विरोधीपक्ष नेते उदयसिंग पाटील यांनी मांडली
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




