ICHMH51NEWS.IN
9921600800

दत्ताजीराव कदम महाविद्यालयात अकरावीच्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दत्ताजीराव कदम महाविद्यालयात अकरावीच्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

इचलकरंजी, दि. १३ : दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स व कॉमर्स महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प व पेन देऊन उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

प्राचार्य (प्रो.) डॉ. एस. के. खाडे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत नियमित अभ्यास, शिस्त, वेळेचे नियोजन आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व सांगितले. तसेच महाविद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

विभागप्रमुख श्री. कुंभार यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. आत्मविश्वास वाढविणारा हा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांचे स्वागत करताना प्रा.एस के खाडे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा