ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी न्यायालयातील विशेष लोकअदालतीत ६२ प्रकरणे निकाली; तब्बल ₹२.४३ कोटींची वसुली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी न्यायालयातील विशेष लोकअदालतीत ६२ प्रकरणे निकाली; तब्बल ₹२.४३ कोटींची वसुली

इचलकरंजी :

इचलकरंजी येथील जिल्हा न्यायालयात धनादेश न वटल्याप्रकरणीआयोजित विशेष लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित ६२ प्रकरणांचा तडजोडीने निकाल लावण्यात आला. या माध्यमातून २ कोटी ४३ लाख ९८ हजार ८८९ रुपयांची वसुली करण्यात आली.

ही विशेष लोकअदालत मा. एल. डी. बिले, अध्यक्ष, हातकणंगले तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश-१, इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. लोकअदालतीसाठी वित्तीय संस्थांच्या न्यायालयातील २९० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती, त्यापैकी ६२ प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आली.

लोकअदालतीसाठी एक पॅनेल नियुक्त करण्यात आले होते. मा. ए. एन. पाटील, निवृत्त जिल्हा न्यायाधीश यांनी पॅनेल प्रमुख म्हणून, तर ॲड. किर्ती जैंद यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले.

लोकअदालत यशस्वी करण्यासाठी इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. आर. आर. तोष्णीवाल, उपाध्यक्ष ॲड. राजाराम सुतार, सचिव ॲड. अभिजीत माने, सहसचिव ॲड. आदित्य मुदगल, खजिनदार ॲड. विजय शिंगारे, तसेच ॲड. राहुल काटकर, ॲड. शैलेंद्र रजपूत, ॲड. महेश कांबळे, ॲड. दिपाली हणबर, ॲड. अर्चना कुलकर्णी (ओगले), ॲड. किर्ती जैंद, सिनीअर ॲड. अमित सिंग, ॲड. इरफान जमादार, ॲड. डी. डी. पाटील, ॲड. मेहबूब बाणदार, ॲड. रागिणी मोरबाळे, ॲड. बसवेश्वर हिरेमठ (स्वामी) यांच्यासह वकील संघटनेचे सदस्य, बार असोसिएशनचे लिपिक प्रवीण फगरे, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, जिल्हा न्यायालयाच्या अधीक्षक सविता राजकर, हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिरजकर, जिवक गोंधळी, अभिजीत माने, प्रशांत कोळी, केतन मगर, न्यायालयीन कर्मचारी, वित्तीय संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच उपस्थित पक्षकारांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विशेष लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोडीने निकाली निघाल्याने पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मोठी मदत झाली असून न्यायप्रक्रियेलाही गती मिळाली आहे.

लोकअदालत प्रसंगी घेतलेले छायाचित्र

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा