ICHMH51NEWS.IN
9921600800

पगार वाटपाचे कारण सांगून १.३५ लाख रुपये लंपास; दोघांविरुद्ध गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पगार वाटपाचे कारण सांगून १.३५ लाख रुपये लंपास; दोघांविरुद्ध गुन्हा

इचलकरंजी, दि. १९ : कामगारांचा पगार वाटपासाठी मालकांनी पैसे मागितल्याचे सांगून विश्वास संपादन करत १ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सौ. लता संजय माने (रा. बापू मासाळ गल्ली, जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरिफ कादरी व फजल आरिफ कादरी (दोघे रा. साई मंदिराजवळ, कबनूर, ता. हातकणंगले) यांच्याविरुद्ध फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या कारखान्यात काम करत होते. त्यांनी यापूर्वी कौटुंबिक गरजेसाठी दोन लाख रुपये उसने मागितले होते. १२ जून रोजी फिर्यादी घरी असताना आरोपींनी “कामगारांचा पगार वाटण्यासाठी मालकांनी घरात ठेवलेले पैसे मागितले आहेत,” असे सांगून विश्वासाने १ लाख ३५ हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊन तेथून निघून गेले.

त्यानंतर फिर्यादीच्या पतीने पैसे परत मागितले असता आरोपींनी पैसे घेतल्याचे नाकारले. तसेच पैशांसाठी तगादा लावल्यास फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा