वीज दरवाढ सवलत मुदतवाढीची आ.आवाडेंची मागणी
यंत्रमाग उद्योगांसाठी लागू असलेल्या वीज दर सवलत योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ मिळणेची मागणी आमदार मा.राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांचेकडे केली.
इचलकरंजी शहर व परिसर हे महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाचे प्रमुख केंद्र असून येथे हजारो लघु व मध्यम यंत्रमाग उद्योजक कार्यरत आहेत. या उद्योगावर थेट व अप्रत्यक्षपणे लाखो कामगार व त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. राज्य शासनाने यंत्रमाग उद्योगाला दिलेली वीज दर सवलत ही या उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वीज दर सवलतीचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत दि. १२ ऑगस्ट, २०२६ आहे. मात्र, अनेक उद्योजकांची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. विशेषतः अनेक उद्योजकांना महावितरणच्या वीज जोडणीवरील नावांमध्ये आवश्यक दुरूस्ती व बदल करून घ्यायचे आहेत. तसेच मालकी हक्क, उद्योगाशी संबंधित इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कालावधी लागत आहे. या प्रशासकिय प्रक्रियांमुळे अनेक पात्र उद्योजक नोंदणी पूर्ण करू शकलेले नाही. त्याचबरोबर मध्यंतरी १५ ते २० दिवस सर्व्हर बंद असल्यामुळे अनेक उद्योजाकंना नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे आमदार राहुल आवाडे यांना दि इचलरकंजी पॉवरलुम असोसिएशनने ऑनलाईन नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ मिळणेविषयी प्रयत्न करणेचे निवेदन दिले होते.
त्यानुसार आज आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांना उद्योग हिताचा विचार करून इचलकरंजीसह राज्यातील सर्व यंत्रमाग उद्योजकांना वीज दर सवलतीचा लाभ मिळणेसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढविण्याचे निवेदन दिले.
वस्त्रोद्योग मंत्री यांना मुदतवाढ निवेदन देताना आ.राहुल आवाडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









