ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीशिवतीर्थ ई-बसस्थानक नामकरणाची शिवसेनेची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीशिवतीर्थ ई-बसस्थानक नामकरणाची शिवसेनेची मागणी

इचलकरंजी :

शहरातील श्रीशिवतीर्थ परिसरात प्रस्तावित ई-बसस्थानकास ‘श्रीशिवतीर्थ ई-बसस्थानक’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापौर उदय धातुंडे यांना निवेदन दिले.

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरात ई-बस सेवा सुरू करण्यात येत असून, त्यासाठी श्रीशिवतीर्थ परिसरात बसस्थानक उभारण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातील बसस्थानकास अन्य कोणतेही नाव न देता ‘श्रीशिवतीर्थ ई-बसस्थानक’ असेच नामकरण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे दैवत असून, त्यांच्या परिसरातील बसस्थानकास ‘श्रीशिवतीर्थ’ हे नाव देणे योग्य ठरेल. मागणी मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संजय चौगुले यांनी दिला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, नगरसेवक सयाजी चव्हाण, धनाजी मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी महिला आघाडी उपजिल्हासंघटिका मंगलताई मुसळे, युवासेना तालुकाप्रमुख अभिजित लोले, शहरप्रमुख सागर जाधव, शहरसमन्वयक रतन वाझे, राजेंद्र मोकाशी, गणेश जंगटे, अरविंद मस्के, कुमार धप्पाधुळे, शितल मगदूम, जोहेब हलगले, अस्लम खलिफा, कुबेर लाटवडे, संतोष गौड, अविनाश धुळुगडे, सागर सातपुते, विनायक पोवार, मारुती बन्ने, सतीश कोळेकर, उत्तम टेंभूगडे, बाबासाहेब जाधव, महिला आघाडीच्या शोभा कोलप, शोभा माने, लक्ष्मी बुरले, परवीन मकानदार, सुरज लाड, धारासिंग राजपूत, चेतन आगलावे, प्रथमेश कंदले, राहुल घुगरे, अमित पडीयार, मल्लेश यळसंगी, यशवंत चव्हाण, सलमान रजा यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत महानगरपालिका परिसर दणाणून सोडला.

 

प्रतिक्रिया-

जनआंदोलन उभे करणार-संजय चौगुले
जर बसस्थानकास शिवतीर्थ बस स्थानक असे नाव दिले नाही तर मनपा प्रशासनास मोठ्या जनआंदोलनास सामोरे जावे लागेल असे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी सांगितले.

निवेदन देताना जिल्हाप्रमुख संजय चौगुले,नगरसेवक शिवाजी पाटील,सयाजी चव्हाण व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा