ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत १७ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत १७ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली,शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील

इचलकरंजी :

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा येथून रॅलीस प्रारंभ होऊन श्री. शिवतीर्थ मार्गे महात्मा गांधी पुतळा येथे रॅलीचा समारोप होणार आहे. आमदार डॉ. राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर, खेळाडू, विद्यार्थी, NCC/MCC, युवक-युवती, फिटनेस क्लब व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम व राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान जागविणाऱ्या या रॅलीत शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा