डीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची महापारेषणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड
इचलकरंजी, दि. २५ :
डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील सौरभ मगदूम व निशींगधा पाटील यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) मध्ये सहाय्यक अभियंता पदावर वार्षिक १३ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे.
सिव्हील इंजिनिअरिंग क्षेत्रात शासकीय नोकऱ्यांना मोठी मागणी असून, विद्यार्थ्यांना या संधींचा लाभ मिळावा यासाठी डीकेटीईमध्ये वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान व कार्यशाळांचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवेसाठी योग्य दिशा मिळत असल्याचे विद्यार्थी व पालकांनी सांगितले.
संस्थेतील सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स आणि आधुनिक शिक्षण सुविधा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शासकीय नोकरीसाठी सक्षम करत आहेत. या गुणवत्तेच्या बळावर सिव्हील इंजिनिअरिंग विभागाची शंभर टक्के प्लेसमेंटकडे वाटचाल सुरू आहे.
भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड व्हावी यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील, असा विश्वास संचालिका प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्यासह सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संचालिका डॉ. एल.एस. आडमुठे, डेप्युटी डायरेक्टर डॉ. यू.जे. पाटील व विभागप्रमुख डॉ. एस.के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी : महापारेषणमध्ये निवड झाल्याबद्दल डीकेटीईचे विद्यार्थी सौरभ मगदूम व निशींगधा पाटील यांचा सत्कार करताना कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका डॉ. एल.एस. आडमुठे व इतर.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







