ऋतुराज काॅलनी गणेश उत्सव मंडळात लघुपट संवाद संपन्न
इचलकरंजी :
ऋतुराज काॅलनी गणेश उत्सव मंडळ येथे लघुपट संवाद संपन्न झाला. यासाठी संवादक म्हणून जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर यांनी मार्गदर्शन केले.
मंडळाचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांनी स्वागत केले. पाहुण्यांची ओळख सुरेखा कुंभार यांनी करुन दिली. लघुपट संवाद घडवताना संजय रेंदाळकर म्हणाले, “पर्यावरणपूरक गणेशोत्सव, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, कोरोना काळात झाडे लावण्याचा संकल्प यातून आज काॅलनी परिसर नंदनवनात रुपांतरित झाला आहे.” यावेळी वुमन अँथम, शिवरायांचे आज्ञापत्र, पहल, मॅन, लड्डू, अलाईक हे लघुपट दाखवून चर्चा घडवण्यात आली.चर्चेत सहभागी झालेल्यांना पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी सुरेश कराळे ,विजय देसाई, स्नेहल माळी, अशोक वरुटे, दामोदर कोळी, वैभवी आढाव यांचेसह परिसरातील नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अमोल पाटील व रोहित दळवी यांनी तांत्रिक सहकार्य केले. सुरेश कुंभार यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सुनिल म्हेत्रे यांनी मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800