खोखो निवड चाचणीस उस्फुर्त प्रतिसाद,११९ मुलींसह ३४७ खेळाडू सहभागी.
कोल्हापूर ::
होतकरू खेळाडूतील गुणवत्ता शोध आणि प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन या उद्देशातून भारतीय खेल प्राधिकरण (साई) यांचेकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला खो खो च्या खेळाडूंकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.गोकूळ शिरगाव हद्दीतील राव’ज ॲकडमी मध्ये आज घेण्यात आलेल्या या खोखो निवड चाचणीत ३४७ खेळाडू सहभागी झाले होते.त्यामध्ये ११९ मुली होत्या.
प्रगत तंत्रज्ञानातून खेळाडूंची तयारी करुन घेऊन आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण या उदात्त हेतूने येथील गोकुळ शिरगाव हद्दीत कार्यरत असलेल्या कबड्डी राव’ज ॲकडमीला साई कडून खेलो इंडियाचे सेंटर मिळाले आहे.त्यामध्ये ९ ते १२ ,१३ ते १५ आणि १६ ते १८ अशा तीन वयोगटात कबड्डी व खोखो मुले-मुली खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली.एकंदरीत एक हजाराहून अधिक खेळाडूंची वजन, उंची,सीट .अप,शटल रन,लांब उडी,सिट ॲन्ड रिच,मेडिसीन बॉल,३० व १६०० मि.धावणे, अशा विविध क्षमता चाचणीसह खेळातील कौशल्ये यांची नोंद करण्यात आली. ही माहिती ऑनलाइन
साईकडे पाठविण्यात आली .तिथे ती अवलोकनी घेऊन गुणवत्ता यादी तयार होणार आहे.ती थेट kirti sports.com या संकेतस्थळावर पाहता येईल ,असे साईंच्या प्रतिनिधींनी सांगितले.
दोन दिवस कबड्डी खेळाडूंची आणि आज खोखोची निवड चाचणी आज पार पडली.खोखो असोसिएशनचे राजेंद्र उरुणकर व पदाधिकारी, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी प्रा.संभाजी पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष व ॲकडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ.रमेश भेंडिगिरी व पदाधिकारी, ॲकडमी सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू उमा भेंडिगिरी, राज्य कबड्डी संघटनेचे सदस्य प्रा.आण्णासाहेब गावडे,पंच मंडळ सदस्य अजित पाटील, जिल्हा संघटनेचे प्रा.चंद्रशेखर शहा व क्रीडा शिक्षक आदिनी हा उपक्रम यशस्वी केला.
क्षमता चाचणी व कौशल्ये यासाठी प्रा.आण्णासाहेब गावडे,उमा भेंडिगिरी, सयाजी पाटील,शंकर पोवार, प्रा.कुबेर पाटील, हेमंत खानविलकर,शरद तावदारे,प्रा.अमित कागले,राहूल कुलकर्णी,शांति लाल मुसळे, अमोल मेटे,संतोष कुंडले,सोनल बाबर, संदिप जाधव,एस.एस.चौगले, कमरुद्दीन देसाई, युवराज गावडे आदिनी जबाबदारी पार पाडली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800