कै.कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फौंडेशनच्यावतीने गणेश चतुर्थी विविध कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी
ता गडहिंग्लज येथील हरळी बु या ठिकाणी कैलासवासी कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फौंडेशन यांच्यावतीने गणेशचतुर्थी निमित्त खास महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन सौ महानंदा रविंद्र कदम यांनी केले होते
खेडेगावातील महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीपणे पार पाडला यामध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा पाक कला उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या त्यामधून त्यांनी प्रत्येकी तीन क्रमांक काढून त्यांना बक्षीस व सत्कार करण्यात आला
त्यामध्ये उखाणा स्पर्धा पहिले पारितोषिक मनीषा सुतार दुसरा क्रमांक संगीता नौकुडकर तिसरा क्रमांक लिलाबाई चौगुले त्यानंतर पाककला स्पर्धेसाठी विजेता पहिला क्रमांक संगीता नौकुडकर दुसरा क्रमांक लता घेवडे तिसरा क्रमांक लता तावडे संगीत खुर्ची विजेता पहिला क्रमांक वर्षा पाटील दुसरा क्रमांक तेजस्विनी सुतार तिसरा क्रमांक विमल बामणे लिंबू चमचा विजेता पहिला क्रमांक लता तावडे दुसरा क्रमांक ऋतुजा पाटील तिसरा क्रमांक मनीषा सुतार यांना देण्यात आले सर्व स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी
परीक्षक म्हणून भारती नौकुडकर महानंदा कदम हौसाबाई परीट चंद्रभागा पोटे व पताडे मॅडम यांनी उत्तमरीत्या कार्यभाग सांभाळला या कार्यक्रमासाठी फौंडेशन चे अध्यक्ष श्री संदीप पाटील उपाध्यक्ष श्री रवींद्र कदम सचिव सौ वैशाली पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले
यावेळी गावातील महिलांनी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्याबद्दल सौ महानंदा रविंद्र कदम व फौंडेशन चे आभार मानले

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800