इनामने उठवला अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत इचलकरंजीचा पाणीप्रश्न.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत इचलकरंजी नागरिक मंच तर्फे सुळकुड योजनेच्या अंमलबजावणी साठी जनजागृती करण्यात आली.
इचलकरंजी शहरात अनंत चतुर्दशीची मिरवणुक मोठ्या उत्साहात पार पडली व लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.दरवर्षी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने गणेशोत्सव मंडळांचा सन्मान करून प्रोत्साहन देत असल्याबाबत स्वागत कक्षांचा सन्मान करण्यात येतो.इचलकरंजी शहरास मंजुर असलेल्या सुळकुड पाणी योजनेसाठी गेल्या १४ महिन्यापासून कृती समितीच्या माध्यमातून विविध आंदोलने सुरू आहेत.गेल्या आठवड्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निदर्शने केल्याप्रकरणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले.
एकीकडे पाण्यासाठी रक्तपाताची भाषा करणारे मोकाट व मंजुर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबावात गुन्हे दाखल केल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.पाणीप्रश्न सुटावा यासाठी इनाम ताकदीने प्रयत्न करत असून आंदोलनातही इनाम सदस्य अग्रभागी असतात. यावर्षी इनामच्या वतीने सुळकुड पाणी योजनेसंदर्भात सर्व स्वागत स्टेजवर जाऊन विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना फलक हातात देऊन प्रबोधन करण्यात आले.
भलेही खाऊ छातीवर गोळी,पण आणणारच, इचलकरंजीकरांच्या घरात स्वच्छ मुबलक पाण्याची नळी..
इचलकरंजी शहरात पाणी मागणे गुन्हा आहे का?
जनतेच्या न्याय मागणीसाठी आंदोलन करणे गुन्हा आहे का?
इचलकरंजीकरानो हीच परिस्थिती राहिली तर आपल्या गावाला न्याय कधी मिळणार?
असे लक्षवेधी फलक मिरवणुक मार्गावर चर्चेचा विषय बनले होते.सर्वच राजकीय पक्ष व संघटनांना एकमुखाने सदर योजनेच्या अमलबजावणी साठी आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजु कोन्नुर,सुहास पाटील,उमेश पाटील,दीपक पंडित,उदयसिंह निंबाळकर,विद्यासागर चराटे,प्रज्योत चौगुले,जतीन पोतदार,शितल मगदूम,अमित पटवा, संजय गुगळे,राम आडकी,शिवकुमार मुरतुले सर,अरिहंत पटवा,बाळु भंडारी,गोपाल पटेकरीअमोल ढवळे,राजेश बांगड,अभिजित पटवा उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800