आ.प्रकाश आवाडेंचा राहुल आवाडेंसह अमित शहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश.

इचलकरंजी
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा कार्यकर्ता मेळावा सैनिक दरबार हॉल, कोल्हापूर येथे संपन्न झाला. या मेळाव्यात इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी आज भारताचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमितजी शहा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रभारी भूपेंद्रजी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र येऊन देशहितासाठी आणि जनहितासाठी कार्य करण्याचे असे आवाहन केले. पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणात बळकटी येणार आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये याचा प्रभावी परिणाम दिसून येईल.माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वतः आ.आवाडे व राहुल आवाडे यांना स्टेजवर नेत पक्षप्रवेश केला.
यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार धनंजय महाडिक, महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडे, सौ. मोश्मी आवाडे,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेशराव हाळवणकर यांचा सन्मान राखण्याची आवश्यकता.
आ.आवाडे यांनी राहुल आवाडे यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळणार असल्याचे सकाळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.माजी आ.सुरेश हाळवणकर यांनी पराभावानंतर ही भाजपचे संघटनात्मक काम जोमाने गेल्या ५ वर्षात सुरू ठेवले आहे.आ.आवाडेंच्या प्रवेशानंतर हाळवणकर यांना सन्मानजनक पद देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पक्षश्रेष्टींनी पार पाडावी अशी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800