चंदगड तालुका डिजिटल मीडियाची नवी कार्यकारिणी अध्यक्षपदी संपत पाटील तर उपाध्यक्षपदी प्रदीप पाटील
चंदगड : सी एल वृत्तसेवा
८६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया परिषदेच्या चंदगड शाखा अध्यक्षपदी सी एल न्यूज चे संपादक संपत पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी प्रदीप पाटील तसेच सरचिटणीसपदी सत्य घटना डिजिटलचे संपादक राहुल पाटील यांची निवड जिल्हा कार्यकारणी कडून जाहीर करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अंतर्गत ही डिजिटल मीडिया कार्यकारणी कार्यरत राहील. काल निवड करण्यात आलेल्या नव्या कार्यकारी मंडळात पुढील पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. अध्यक्ष- संपत पाटील (नांदवडे), उपाध्यक्ष- प्रदीप पाटील (शिवनगे), सरचिटणीस- राहुल पाटील (यशवंतनगर), खजिनदार- सागर चौगुले (तुर्केवाडी), संपर्कप्रमुख- संजय केदारी पाटील (तेऊरवाडी), प्रसिद्धीप्रमुख- राजेंद्र शिवनगेकर (रामपूर), सहप्रसिद्धीप्रमुख- उत्तम पाटील (तुडये), सदस्य- उदयकुमार देशपांडे (दाटे), विजय ढेरे (रामपूर), अनिल धुपदाळे (चंदगड), श्रीकांत पाटील (कालकुंद्री), संतोष सावंत भोसले (उत्साळी/ चंदगड), संजय मष्णू पाटील (कोवाड), संजय कुट्रे (किणी), लक्ष्मण आडाव (कोवाड), तातोबा गावडा (मुगळी), चेतन शेरेगार (चंदगड), संदीप तारीहाळकर (कागणी) आदींचा समावेश करण्यात आला आहे.
डिजीटल मिडियाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800