बेळगाव सीमाभाग डिजिटल मीडिया कार्यकारिणी जाहीर; सुहास हुद्दार यांची अध्यक्षपदी तर सेक्रेटरीपदी श्रीकांत काकतीकर निवड




बेळगाव : बेळगाव सीमाभाग डिजिटल मीडिया कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडियाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे तसेच कार्याध्यक्ष संतोष उर्फ सनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यकारिणीची घोषणा राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धूपदाळे यांनी केली.
८६ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया परिषदेच्या बेळगाव सीमाभाग डिजिटल मीडिया परिषदेच्या बेळगाव शाखा अध्यक्षपदी बेळगाव वार्ताचे संपादक सुहास हुद्दार यांची तर सेक्रेटरीपदी नॅशनल टूडेचे संपादक श्रीकांत काकतीकर यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न सीमाभाग बेळगाव पत्रकार संघाच्या अंतर्गत ही डिजिटल मीडिया कार्यकारिणी कार्यरत राहील. नुकताच निवड करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणी मंडळात पुढील पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. अध्यक्ष – सुहास हुद्दार (संपादक, बेळगाव वार्ता), उपाध्यक्ष – अरुणा गोजे- पाटील (संपादिका, संदेश न्यूज), सेक्रेटरी – श्रीकांत काकतीकर (संपादक, नॅशनल टुडे), खजिनदार – दीपक सुतार (संपादक, डी मीडिया), संपर्कप्रमुख – उपेंद्र बाजीकर (संपादक, स्मार्ट न्यूज), प्रसिद्धी प्रमुख – रवींद्र जाधव (संपादक, बीएन7 न्युज).
सदस्य – प्रकाश बिळगोजी (संपादक – बेळगाव लाईव्ह), अक्षता नाईक (संपादिका – बेळगाव केसरी), अमृत बिर्जे (संपादक – बेलगाम प्राईड), दिनकर मरगाळे (संपादक – आपलं खानापूर), पिराजी कुऱ्हाडे (संपादक – खानापूर लाईव्ह), सुहास पाटील (संपादक – संदेश क्रांती), रोहन पाटील (संपादक- न्यूज24तास मराठी), महादेव पवार (संपादक- डेली व्यूव) आदींचा समावेश करण्यात आला आहे. निवड पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800