इचलकरंजीत बिरला शक्ती सिमेंटतर्फे अभियंता मेळावा उत्साहात.
इचलकरंजी –
बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने इचलकरंजी मधील इंजिनिअर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, बिल्डर यांचा मेळावा इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाला बिरला शक्ती सिमेंटचे नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख, रिजनल सेल्स मॅनेजर निशाद जोशी, सेल्स प्रमोटर नितीन धूत, रिजनल मॅनेजर जयवंत लोखंडे, शादाब शिलेदार, सेल्स ऑफिसर दिपक सावंत, आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोशिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खंडेराजुरी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन फैयाज गैबान, क्रेडाई प्रेसिडेंट मयूर शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख यांनी केले. त्यानंतर प्रास्ताविकपर भाषणात नितीन धूत यांनी आपण सर्वांनी कंपनीला दिलेली साथ व कंपनीवर दाखवलेला विश्वास बहुमूल्य आहे व इथून पुढच्या काळातही हा विश्वास व आपली साथ कायम ठेवावी असे सांगितले.
बिरला शक्ती सिमेंट चे टेक्निकल इनचार्ज प्रकाश यांनी बिरला शक्ती सिमेंट विषयी माहिती देत उत्पादनाच्या तांत्रिक बाबी त्याचबरोबर गुणवत्तेची व बिरला शक्ती केसोराम प्लास्टर या नवीन उत्पादनाची माहिती दिली.
यावेळी आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोशिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खंडेराजुरी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन फैयाज गैबान आणि 2025-26 साठी रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट गव्हर्नरपदी इंजिनिअरींग अरुण भंडारे यांची निवड झाल्याबद्दल या सर्वांचा बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख यांच्या शुभहस्ते फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार हर्षल धुत यांनी मानले. याप्रसंगी इचलकरंजी व परिसरामधील २०० हून अधिक इंजिनिअर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, बिल्डर उपस्थित होते.
फोटो – बिरला शक्ती सिमेंटच्या अभियंता मेळाव्याप्रसंगी मुद्दसर शेख, निशाद जोशी, नितीन धुत, जयवंत लोखंडे, शादाब शिलेदार, दीपक सावंत, राजेंद्र खंडेराजुरी, फैयाज गैबान, अरुण भंडारे, हर्षल धूत आदी मान्यवर
व्हिडीओ
https://ichmh51news.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241026-WA0216.mp4

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800