आपटे वाचन मंदिराच्या दिवाळी अंकांच्या वितरणाचा शुभारंभ
इचलकरंजी
आपटे वाचन मंदिराच्या वतीने दरवर्षी दिवाळी अंकांचे वितरण होत असते.यावर्षी या अंकांचे वितरण महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील सफाई कामगारांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुषमा दातार यांनी केले.वाचनालयाच्या सर्व उपक्रमांची माहिती कार्यवाह माया कुलकर्णी यांनी दिली.आरोग्य अधिकारी डॉ.सुनीलदत्त संगेवार यांनी आपटे वाचन मंदिराने या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील काही दुर्लक्षित घटकांना सन्मानित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच आपटे वाचन मंदिराच्या सर्वच उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.आभार राजेंद्र घोडके यांनी मानले.सफाई कामगारांच्या हस्ते संपन्न झालेल्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमामुळे उपस्थित असलेले सफाई कामगार रवी हेगडे,पप्पू आवळे,संदीप आवळे,शरद पारसे,अनिल कांबळे,प्रभाकर जावळे,राजू कांबळे,छाया गेजगे,परशराम सोनिले,कमल आवळे हे भारावून गेले. यावेळी माजी अध्यक्ष व संचालक ॲड.स्वानंद कुलकर्णी,सहकार्यवाह डॉ.कुबेर मगदूम,संचालक काशिनाथ जगदाळे, प्रा.मोहन पुजारी,डॉ. सुजित सौंदत्तीकर उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800