ICHMH51NEWS.IN
9921600800

मदन कारंडेंच्या प्रचाराचा कबनुरात शुभारंभ.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मदन कारंडेंच्या प्रचाराचा कबनुरात शुभारंभ.
इचलकरंजी : मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी वचनबद्ध आहे.महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने एकदिलाने प्रचारयंत्रणा राबवावी, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी केले.
  महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मदन कारंडे यांचा प्रचार प्रारंभी आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हिंदुराव शेळके होते.
  अरुण गीते यांनी स्वागत केले.माजी सरपंच उदय गीते यांनी प्रास्ताविक केले.शशांक बावचकर,सयाजी चव्हाण,रणजीत जाधव,सदा मलाबादे,माजी नगरसेवक प्रमोद पाटील,प्रकाश मोरबाळे,माजी सरपंच गोपीनाथ सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.हिंदुराव शेळके यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
 प्रारंभी येथील ग्रामदैवत जंदीसाहेब व ब्राॅनसाहेब दर्गा,दावल मलिक दर्गा,श्री हनुमान मंदिर,श्री महादेव मंदिर व हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ येथे पुष्पहार व श्रीफळ वाढवून प्रचार प्रारंभ करण्यात आला.
    यावेळी कॉम्रेड आनंदराव चव्हाण,राष्ट्रवादी (शरदचंद पवार) चे बाबासाहेब कोकणे,दिग्विजय इंगवले,शिवा चव्हाण,नंदकुमार जोशी,प्रसाद कुलकर्णी,शिवसेनेचे प्रशांत जगताप,जंबा पाटील,कुणाल भोसले,मल्लाप्पा माळी,राजू मुल्ला,रियाज चिकोडे,सुधाकर कुलकर्णी,प्रा.शरद कांबळे,आशिष पाटील,विशाल पवार,मुजमिल मुजावर,दादा उर्फ पायगोंड पाटील,अमोल अण्णासो पाटील,उमेश पाटील,ऋषिकेश चव्हाण,अकबर सनदी,दादासो कांबळे,शिवाजी चव्हाण,सुनील नरंदेकर,विनायक पवार,हेमंत देसाई,कृष्णात मगर,गनी मुल्ला,शब्बीर अपराज आदी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा