महाविकास आघाडी एकसंघ,जांभळे गटाचा मदन कारंडेना पाठिंबा.
इचलकरंजी
मा. आमदार अशोकराव जांभळे आणि मा. सुहास जांभळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन सिताराम कारंडे यांना आपला पूर्ण पाठिंबा देत आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी एकसंघ झाली असून महाविकास आघाडीच्या विजयाच्या संधी अधिक बळकट झाल्या आहेत.अशोकराव जांभळे आणि सुहास जांभळे यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज मागे घेतल्यानंतर सुहास जांभळे यांनी संघटितपणे प्रचार करून मदन कारंडे यांना। निवडून आणणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
यावेळी समन्वयाची भुमिका मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके व हिंदुराव शेळके यांनी निभावली.यावेळी रणजित जाधव,उदयसिंग पाटील,अमरजीत जाधव,अब्राहाम आवळे,प्रकाश मोरबाळे उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








