इचलकरंजीत तेरा उमेदवार रिंगणात,५ जणांची माघार.
इचलकरंजी:
इचलकरंजी विधान सभा मतदार संघात छाननीनंतर १८ वैध उमेदवार शिल्लक राहिले होते. यातील किती उमेदवार माघार घेणार याकडे लक्ष लागले होते. आज एकूण ५ जणांनी माघार घेतली. यामध्ये सुहास अशोक जांभळे, आरती माने, मुद्दसर समडोळे, प्रदीप कांबळे, इम्रान सनदी या सर्व अपक्षांनी माघार घेतली.
आता विधानसभा रिंगणात राहूल आवाडे (भाजप), मदन सिताराम कारंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार), अमर शिंदे (बसपा), रवी गोंदकर (मनसे), शमशुद्दीन मोमीन (वंचीत आघाडी), प्रशांत गंगावणे (देश जनहीत पार्टी), सचिन बेलेकर (राष्ट्रीय समाज पक्ष), विठ्ठल चोपडे, सॅम उर्फ सचिन आठवले, अभिषेक पाटील, मदन येताळा कारंडे, रावसो निर्मळे, शाहूगोंडा पाटील (सर्व अपक्ष) असून यामध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत होणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







