ICHMH51NEWS.IN
9921600800

राहुल आवाडेंच्या पदयात्रेस तारदाळ खोतवाडीत उस्फुर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल आवाडेंच्या पदयात्रेस तारदाळ खोतवाडीत उस्फुर्त प्रतिसाद.
इचलकरंजी –
महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ तारदाळ आणि खोतवाडी या गावात काढण्यात आलेल्या पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तारदाळ येथे आमदार प्रकाश आवाडे, विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामदैवत श्री शिरकाई देवी मंदिर येथे श्रीफळ वाढवून तर खोतवाडी येथे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथे हनुमानाचा आशिर्वाद घेऊन पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. दोन्ही ठिकाणच्या पदयात्रेत तरुणवर्गासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मतदारसंघातील तारदाळ आणि खोतवाडी याठिकाणी सर्वच स्तरातून राहुल आवाडे यांना पाठबळ आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भागाभागात महिलांनी त्यांचे औक्षण करत विजयाचे आशिर्वाद दिले. या पदयात्रांमध्ये तरुणवर्गही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. विजयाचा जयघोष आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना राहुल आवाडे यांनी, जिल्हा परिषद सदस्य असताना आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना भविष्यातील विकासाचे व्हिजन काय आहे याची विस्तृत माहिती देत राज्याच्या व मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी महायुतीचेच सरकार सत्तेत आणावे आणि त्यासाठी मतरुपी आशिर्वाद मला द्यावेत, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी मतदारांशी मुक्त संवाद साधला.
खोतवाडीत शिरकाई देवी मंदिरापासून सुरु झालेली पदयात्रा, हनुमान मंदिर, स्वामी गल्ली मार्गे महादेव मंदिर, पाटील गल्ली मार्गे राम मंदिर, बस्ती मार्गे शिवाजी महाराज चौक, मेन नागोबा मंदिर मार्गे विठ्ठल मंदिर, दत्त डेअरी मार्गे दसरा चौक, विकास बन्ने गल्ली ते जाधव गल्ली मार्गे चांदणी चौक, चांदणी चौक ते मातंग समाज, मातंग समाज ते बौद्ध समाज, बौद्ध समाज ते वेतळेश्‍वर मंदिर, वेताळेश्‍वर ते वाल्मिक मंदिर असा सारा भाग पिंजून काढला. तर खोतवाडी येथेही श्री हनुमान मंदिरापासून पदयात्रेचा शुभारंभ होऊन संपूर्ण परिसरासह विठ्ठल मंदिर ते ग्राम पंचायत ते महादेव मंदिर अशी झाली.
यावेळी प्रसाद खोबरे, भाजप शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, उपाध्यक्ष दिपक पाटील, भीमराव बने, गुरुप्रसाद पाटील, रणजीत पवार, सचिन पवार, मृत्युंजय पाटील, भाऊ वाणी, के.जी. पाटील, प्रकाश खोबरे, सुशांत शिंदे, विजय चौगुले, सचिन चौगुले, प्रवीण पाटील, योगेश वाणी,  संजय चोपडे, भारत बोंगार्डे, सरपंच विशाल कुंभार, उपसरपंच निर्मला खोत, अरविंद माने, गजानन नलगे, शिल्पा पोवार, करण खोत, वैभव पोवार, हेमा खोत, वैशाली माने, मेघा खोत, सरिता पोवार, महेश खोत, नंदकुमार पोवार, प्रभाकर भोळ, नरोत्तम लाटा, माधुरी सुतार, रेखा कंदलगे, हर्षा भांगे आदी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा